जामनेरच्या राजकारणात खळबळ –मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या राजकारणात खळबळ –मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांचा भाजपात प्रवेश

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर :जामनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला आज मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.

हा पक्षप्रवेश मंत्री तथा आमदार गिरीश भाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. पाटील यांच्या प्रवेशावेळी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत अण्णा बाविस्कर, माननीय जितेंद्र पाटील, जे.के. चव्हाण साहेब, संजय दादा गरुड, बबलू शेठ, आबा पाटील, एकनाथ लोखंडे, आत्माराम गावंडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पक्षात प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना गिरीश महाजन यांनी सर्वांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या प्रवेशामुळे जामनेर तालुक्यात भाजपची ताकद अधिक वाढणार असून आगामी निवडणुकीत त्याचा मोठा परिणाम दिसून येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads