जळगाव जिल्ह्यात आरोग्य सेवांचा आढावा – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा दर्जेदार सेवांचा निर्धार
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जळगाव – जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. बैठकीत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांचे कार्य याबाबत सविस्तर चर्चा झाली.
तसेच रुग्णवाहिका सेवा, विविध आरोग्य योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी यावरही भर देण्यात आला. नागरिकांना दर्जेदार आणि त्वरित आरोग्य सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिल्या. उद्दिष्ट – प्रत्येक नागरिकापर्यंत उत्तम आरोग्यसेवा पोहोचवणे
या बैठकीत आरोग्य सुविधांचा दर्जा उंचावून प्रत्येक नागरिकापर्यंत योग्य व वेळेत सेवा पोहोचवण्याचा निर्धार करण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा