गणपती दर्शन पार्कचा राजा ... चिमुकल्यांच्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - दैनिक शिवस्वराज्य

गणपती दर्शन पार्कचा राजा ... चिमुकल्यांच्या स्टॉलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर  आज गणपती दर्शन पार्कचा राजा येथे लहान चिमुकल्यांनी वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवला. विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून या चिमुकल्यांनी विक्री करत नागरिकांना आकर्षित केले.
दरवर्षी काही ना काही नवनवीन प्रयोग करणाऱ्या या चिमुकल्यांचा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या उत्साहाने गर्दी केली होती. लहान मुलांच्या उत्साहाला आणि आत्मविश्वासाला मोठ्यांनीही भरभरून सहकार्य केले.
 चमचा गोठी, संगीत खुर्ची, खाद्यपदार्थांची चविष्ट मेजवानी अशा उपक्रमांमुळे गणेशोत्सवात वेगळाच रंग भरला. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी यात सहभाग घेतल्याने वातावरण उत्साहवर्धक बनले.
या उपक्रमातून लहान मुलांमध्ये व्यवहारकौशल्य, आत्मविश्वास, जबाबदारीची जाणीव निर्माण होत असल्याचे पालकांनी सांगितले.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads