पुन्हा धक्कादायक घटना पाचोऱ्यानंतर आता बोदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार - दैनिक शिवस्वराज्य

पुन्हा धक्कादायक घटना पाचोऱ्यानंतर आता बोदवड तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जळगाव  जिल्ह्यातील समाजमन हादरवणाऱ्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. अगोदर पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात अंतर्गत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल होऊन खळबळ माजली होती. त्यानंतर आता बोदवड तालुक्यातील एका गावात पुन्हा तसाच संतापजनक प्रकार घडला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीस फूस लावून शेख नाजिम शेख शाबिर या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनुसार बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले असून, न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे, अशी माहिती तपास अधिकारी अनिल बडगुजर यांनी दिली.या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून नागरिकांकडून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. सलग दोन दिवसांत जिल्ह्यात अशा घटनांचा उघड झाल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads