महाराष्ट्र
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डी.बी.टी साठी आधार नोंदणी शिबीर...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर :- संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जाहीर आवाहन करण्यात येते की महाराष्ट्र शासनाने डिसेंबर 2024 पासून संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ डी. बी. टी. प्रणाली व्दारे देण्याचे ठरविले आहे. त्याकरिता सर्व लाभार्थ्यांनी डीबीटी पोर्टलवर नोंदणी व आधार प्रमाणीकरण करुन घेणे आवश्यक आहे. डीबीटी पोर्टलवर आधार नोंदणी न झालेल्या लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय, सोलापूर यांचेवतीने दि.18 ऑगस्ट 2025 ते 23 ऑगस्ट 2025 या कालावधीत विशेष शिबिराचे आयोजन करणेत आले आहे. सदर शिबिरामध्ये संजय गांधी व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांनी बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रांसह खालील नमूद ठिकाणी सकाळी 11.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत उपस्थित राहून लाभार्थी यांनी आपले आधार नोंदणी व प्रमाणीकरण करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार शिल्पा पाटील ( संगांयो शहर कार्यालय सोलापूर ) यांनी केले आहे.
शिबीराचे ठिकाण व दिनांक :-
18 ऑगस्ट. 2025 रोजी - विरशैव ककैय्या समाज मंदीर, ढोर गल्ली , व पंचमुखी हनुमान मंदीर वालचंद गेट समोर
19 ऑगस्ट. 2025 रोजी - विरशेव ककैय्या समाज मंदीर, ढोर गल्ली , व दत्त चौक, दाजी पेठ राममंदीर सोलापूर रुग्णालयशेजारी
20 ऑगस्ट. 2025 रोजी- विरलिगेश्वर समाज मंदीर घोंगडे वस्ती, सोलापूर, व महानगरपालिका कॅम्प शाळा, लष्कर
21 ऑगस्ट. 2025 रोजी- विरलिंगेश्वर समाज मंदीर घोंगडे वस्ती, सोलापूर, व सिध्दगणेश हनुमान मंदीर, भारतरत्न इंदीरा नगर.
22 ऑगस्ट. 2025 रोजी- मडिवाळेश्वर माचदेव परीट जाती मंडळ ट्रस्ट कन्ना चौक, व अष्टभुजा देवी मंदीर मोदीखाना.
या ठिकाणी लाभार्थ्यांनी आधार नोंदणी व प्रमाणीकरण करावे ,जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी. असे आवाहन संजय गांधी निराधार योजना शहर कार्यालय, सोलापूर यांचेकडून करण्यात येत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा