आपल्या आईच्या स्मरणार्थ सुर्यकांत हणमंत कोळी या सेवानिवृत्त शिक्षकांने अंत्रोळी येथील विद्यार्थ्यांनां केले शैक्षणिक साहित्य वाटप... ! - दैनिक शिवस्वराज्य

आपल्या आईच्या स्मरणार्थ सुर्यकांत हणमंत कोळी या सेवानिवृत्त शिक्षकांने अंत्रोळी येथील विद्यार्थ्यांनां केले शैक्षणिक साहित्य वाटप... !


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (अंत्रोळी) : दि. १५ ऑगस्ट २०२५ रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कै. भिमाबाई हणमंत कोळी यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद शाळा अंत्रोळी येथील पहिली ते सातवीतील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. 
       सुर्यकांत हणमंत कोळी हे दरवर्षी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात , यावर्षी मातोश्री च्या स्मरणार्थ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शैक्षणिक साहित्य संच,पेन, पेन्सिल ,वही सचित्र बालमित्र उजळणी हे साहित्य वाटप करण्यात आले.
    आई हि जगातील सर्व श्रेष्ठ ईश्वरीय देणगी असून आईचे उपकार आपण कधीही परतफेड करु शकत नाही.आईच्या संस्कारामुळेच मी घडलो.तेच संस्कार बीज मी शैक्षणिक उपक्रम राबवून रुजवण्याचा प्रयत्न करत आहे.असे आई प्रती व्यक्त होताना सुर्यकांत हणमंत कोळी यांनी भावोदगार काढले.
     यावेळी प्रथमता सुर्यकांत हणमंत कोळी व वैशाली सुर्यकांत कोळी याचा शाल ,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.व मुलगा स्वप्निल सुर्यकांत कोळी, मूलगी स्वरूपा सुमीत कोळी व जावई सुमीत सुनील कोळी याचा शाल ,श्रीफल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
     यावेळी सुर्यकांत हणमंत कोळी व सह परिवार यांनी शालेय साहित्याचे वाटप केले आणि एक समाजात अनोखा आदर्श निर्माण केला कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक तसेच सर्व शिक्षक वर्ग व संरपच , उपसरपंच व तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ बहुसंख्येत उपस्थित होते.
    या कार्यक्रमास समस्त कोळी बांधव व जय वाल्मिक मंडळ अंत्रोळी याचे विषेश सहकार्य लाभले. 
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads