जामनेरात वाकी रोडवर भलमोठं झाड कोसळलं; सुदैवाने मोठा अनर्थ टळला
आज दुपारी साधारण एक वाजताच्या सुमारास जामनेर शहरातील वाकी रोडवरील मराठी शाळेजवळ आणि PWD ऑफिस समोर एक भलामोठं झाड अचानक कोसळून खाली पडले. झाड कोसळल्याने परिसरात काही काळ गोंधळ उडाला.सुदैवाने त्या क्षणी रस्त्यावरून कोणताही नागरिक, विद्यार्थी किंवा वाहनधारक जात नव्हता. अन्यथा या घटनेत मोठा अनर्थ घडला असता.झाड पडल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला असून लाईनचे तारे तुटून जमिनीवर आले आहेत. त्यामुळे नागरिकांना वीज नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.या घटनेची माहिती मिळताच वीज वितरण विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तुटलेली वीज लाइन दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा