ख्वाजा नगर पहुर पेठ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन.. हाफिज अफ़ज़फ खान तजमुल अध्यक्षपदी, जाहिद खान रसूल खान उपाध्यक्षपदी निवड
ख्वाजा नगर पहुर पेठ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन
हाफिज अफ़ज़फ खान तजमुल अध्यक्षपदी, जाहिद खान रसूल खान उपाध्यक्षपदी निवड
जामनेर ता. 03 सप्टेंबर 2025 (बुधवार) रोजी जि.प. उर्दू शाळा, ख्वाजा नगर, पहुर पेठ येथे शाळा व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन शांततापूर्ण वातावरणात उत्साहात पार पडले.या निवड प्रक्रियेत पालकांच्या एकमताने हाफिज अफ़ज़फ खान तजमुल यांची समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर जाहिद खान रसूल खान यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर इतर नवे सदस्यही सर्व पालकांच्या एकमताने व सल्लामसलतीने समितीत सामील करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक सर, सर्व शिक्षकवर्ग तसेच गावातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी नव्याने निवड झालेल्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा