जामनेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात नाराजीचे वारेउपजिल्हा संघटक गणेश पांढरे लवकरच ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत? - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात नाराजीचे वारेउपजिल्हा संघटक गणेश पांढरे लवकरच ‘जय महाराष्ट्र’ करण्याच्या तयारीत?

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

जामनेर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात सध्या असंतोषाची लाट उसळल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना उपजिल्हा संघटक  गणेश पांढरे यांच्यात आणि त्यांच्या समर्थकांमध्ये तालुका प्रमुख पदी प्रकाश पाटील यांची झालेली नियुक्ती मोठ्या नाराजीचे कारण ठरत आहे.या नियुक्तीनंतर गणेश पांढरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांत तीव्र असमाधान पसरले असून, त्यांनी ही नाराजी वरिष्ठ पातळीवर कळविल्याचे समजते. मात्र, यावर दखल घेतली नाही तर लवकरच शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याची तयारी सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे.गणेश पांढरे आणि त्यांचे समर्थक नेमके कोणत्या पक्षात प्रवेश करतील, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे. येत्या काही दिवसांत जामनेर तालुक्यातील शिवसेनेच्या संघटनात्मक समीकरणात मोठे बदल घडण्याची चिन्हे दिसत आहे.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads