महाराष्ट्र
“सिना महापूरग्रस्तांच्या मदतीला एम. के. फाऊंडेशनचे अध्यक्ष महादेव कोगनुरे धावले” ; “गुंजेगाव शाळेत विस्थापित नागरिकांची यांनी घेतली भेट”...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : सिना नदीला आलेल्या विक्राळ पुरामुळे अकोले मंद्रूप व परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे लागले आहे. प्रशासनाच्या मदतीने गावकऱ्यांना तात्पुरते निवाऱ्यासाठी गुंजेगाव येथील शाळेत ठेवण्यात आले आहे.
या स्थलांतरित पूरग्रस्त गावकऱ्यांची एम. के. फाऊंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या निवारा, अन्न, पाणी व आरोग्याच्या मूलभूत गरजांबाबत माहिती घेतली तसेच मदतीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.
यावेळी एम. के. फाऊंडेशन चे अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी पूरग्रस्त कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. दैनंदिन गरजेच्या वस्तू देऊन त्यांनी नागरिकांना दिलासा दिला.
पूरामुळे घरदार सोडून शाळेत आसरा घेतलेल्या गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. या पार्श्वभूमीवर महादेव कोगनुरे यांनी नागरिकांचे मनोबल वाढवण्याचे काम केले. “अडचणीच्या काळात एम. के. फाऊंडेशन सदैव तुमच्या सोबत आहे. कोणतीही अडचण आल्यास आम्ही तत्काळ मदतीसाठी हजर राहू,” असे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त गावकऱ्यांनी या भेटीबद्दल समाधान व्यक्त केले. समाजाच्या मदतीसाठी नेहमी पुढाकार घेणाऱ्या एम. के. फाऊंडेशनच्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा