कन्हाळे खुर्द येथे महिला व माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मोठ्या उत्साहात भाजपात प्रवेश - दैनिक शिवस्वराज्य

कन्हाळे खुर्द येथे महिला व माजी ग्रामपंचायत सदस्यांचा मोठ्या उत्साहात भाजपात प्रवेश

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
भुसावळ तालुक्यातील  कन्हाळे खुर्द येथे भारतीय जनता पार्टीत मोठ्या संख्येने महिला व माजी ग्रामपंचायत सरपंच, सदस्यांनी प्रवेश करून पक्षाला बळकटी दिली. हा प्रवेश सोहळा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री व भुसावळचे लोकप्रिय आमदार माननीय श्री. संजयजी सावकारे यांच्या नेतृत्वात पार पडला.

या प्रसंगी संजय सावकारे मंत्री महाराष्ट्र राज्य, तालुकाप्रमुख प्रशांत पाटील, गोलू पाटील, भालचंद्र पाटील, माजी जि.प. सदस्य समाधान भाऊ पवार, सरपंच मोहन भाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

भाजप प्रवेश करणाऱ्यांमध्ये माजी सरपंच सचिन सपकाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य राजाराम सुरडकर, मिलिंद चौधरी, निवृत्ती पाटील, तसेच दीपक सपकाळे यांचा समावेश आहे. महिलांमध्ये उज्वला कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका ताई, प्रियंका चौधरी, उषा कोळी, लता सुरेखा पाटील, सविता बोंडे, माजी ग्रामपंचायत सदस्य सुरेखा सुरडकर यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

गावकरी मंडळींनी देखील या प्रवेश सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या प्रसंगी आमदार संजयजी सावकारे यांनी सर्वांचे स्वागत करून अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की – भाजपात नव्याने सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे पक्ष अधिक संघटित होणार असून,  कन्हाळे खुर्द संपूर्ण तालुक्याच्या विकासाला गती मिळणार आहे.




Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads