जामनेरातील नरेंद्र शांताराम धुमाळांचा शिंदे गटाला रामराम भाजपमध्ये प्रवेश
जामनेर शहरातील शास्त्रीनगर येथील रहिवासी नामांकित कार्यकर्ते नरेंद्र शांताराम धुमाळ यांनी शिवसेना (शिंदे गट) सोडत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
भाजपमध्ये झालेल्या या प्रवेश सोहळ्याला मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते त्यांनी पक्ष प्रवेश केला.
या वेळी केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे, जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, आमदार राजू मामा भोळे, तसेच ज्येष्ठ नेते रवींद्र झाल्टे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती लाभली.
धुमाळ यांच्या प्रवेशामुळे जामनेरातील भाजपची ताकद अधिक मजबूत झाली असून, कार्यकर्त्यांमध्ये नवीन जोश आणि उत्साह पाहायला मिळत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा