सोनाली भोसले यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी निवड... - दैनिक शिवस्वराज्य

सोनाली भोसले यांची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्षपदी निवड...


समीर शेख प्रतिनिधी 
अंत्रोळी : दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रखर सामाजिक कार्यकर्त्या सोनाली भोसले यांच्या सातत्यपूर्ण सामाजिक योगदानाची दखल घेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी त्यांची महाराष्ट्र प्रदेश मुख्य कार्यकारी अध्यक्ष (युवती विभाग) म्हणून नियुक्ती केली आहे.
    सोनाली भोसले यांच्या प्रामाणिक कार्यपद्धती, नेतृत्वगुण आणि भ्रष्टाचाराविरोधातील ठाम भूमिकेमुळेच त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याचे समितीच्या वतीने सांगण्यात आले.
   राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी अभिनंदन करून, “भोसले यांच्या नेतृत्वामुळे महाराष्ट्रात भ्रष्टाचार निर्मूलनाच्या चळवळीत नवी ऊर्जा आणि ताकद निर्माण होईल,” असा विश्वास व्यक्त केला.
   विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते व महिला मंडळींनी देखील भोसले यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
   ही माहिती अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीकडून शुक्रवारी दुपारी 2 वाजता प्रेसनोटच्या माध्यमातून पत्रकारांना देण्यात आली आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads