शिक्षक दिनानिमित्त गुरुंना कृतज्ञ वंदन : राहुल चव्हाण पाटील - दैनिक शिवस्वराज्य

शिक्षक दिनानिमित्त गुरुंना कृतज्ञ वंदन : राहुल चव्हाण पाटील

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
शिक्षक हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर येतो तो मार्गदर्शन करणारा, आयुष्याला योग्य दिशा दाखवणारा, संस्कार देणारा, व्यक्तिमत्त्व घडवणारा खरा दीपस्तंभ. आई-वडिलांनंतर आयुष्याला अर्थ देणारे आणि सुप्त क्षमतांना उजाळा देणारे म्हणजेच शिक्षक.शिक्षक हा केवळ पुस्तकातील धडे शिकवणारा नसतो, तर तो जीवनाचा खरा धडा शिकवणारा असतो. गणित शिकवताना सुख-दुःखांची बेरीज-वजाबाकी कशी करायची हे सांगणारा, इतिहास शिकवताना संस्कृतीचे मोल पटवून देणारा, विज्ञान शिकवताना जिज्ञासा जपण्याची प्रेरणा देणारा म्हणजे शिक्षक.आजच्या काळात शिक्षकाची भूमिका अधिक महत्त्वाची झाली आहे. शालेय शिक्षणाबरोबरच चारित्र्य, शिस्त, कर्तृत्व आणि मूल्ये घडवण्याचे मोठे कार्य शिक्षक करतो. त्यामुळे आयुष्यात कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या पहिल्या गुरुंचे स्मरण नेहमीच मनात राहते.शिक्षक दिन हा केवळ औपचारिक सण नसून, गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. समाजाचा पाया घडवणारे हे ज्ञानदीपवत शिक्षक खरे नायक आहेत.

या निमित्ताने जामनेरचे राहुल चव्हाण पाटील यांनी आपल्या मार्गदर्शन गुरु आदरणीय जाधव सरांना मनःपूर्वक शिक्षक दिनाच्या शुभेच्छा अर्पण केल्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले 

विद्या दिली, संस्कार दिले,
आयुष्याला अर्थ दिला.
अशा गुरुंचं ऋण कधीही फेडता येत नाही,
फक्त त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करता येते.

राहुल चव्हाण पाटील यांनी या भावनिक संदेशातून आपल्या गुरुंप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकी व्यक्त केली आहे.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads