महाराष्ट्र
“पूरग्रस्त भागाला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची भेट ; जेवण, नाष्टा व चादरींचे वाटप” “रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांचे आवाहन – सुरक्षिततेला प्राधान्य द्या”...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (मंद्रूप) : अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी मंद्रूप पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वडकबाळ परिसरास भेट देवून पूरग्रस्त नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या.
पूरामुळे प्रभावित कुटुंबांना दिलासा देण्यासाठी त्यांच्या हस्ते एक वेळचे जेवण, नाष्टा तसेच उबदार चादरींचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे नागरिकांना धीर व समाधान लाभले.
“संकटाच्या काळात पोलीस विभाग नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. निसर्गाच्या प्रकोपात धैर्य न हरवता शासन यंत्रणेवर विश्वास ठेवा,” असे आवाहन मा. पोलीस अधीक्षकांनी यावेळी केले.
सदर प्रसंगी सुजित नरहरे अप्पर तहसीलदार, मंद्रूप, मनोज पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, मंद्रूप पोलीस ठाणे तसेच पोलीस पाटील अशोक पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, हवामान खात्याने सोलापूर जिल्ह्यासाठी दोन दिवसांचा रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, अनावश्यक प्रवास टाळावा आणि नदी-नाले परिसर टाळून प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा