मातृशक्तीच हिंदू संस्कृतीचा खरा पाया – महंत योगी दत्तनाथ महाराज - दैनिक शिवस्वराज्य

मातृशक्तीच हिंदू संस्कृतीचा खरा पाया – महंत योगी दत्तनाथ महाराज


जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें…

वर्णभेद-मतभेद मिटवून नवसंस्कार निर्माणाचे आवाहन

विश्व हिंदू परिषद अंतर्गत दुर्गावाहिनीचा शेंदुर्णी प्रखंड प्रशिक्षण वर्ग यशस्वी

मातृशक्तीमुळेच हिंदू संस्कृतीचे जतन – महंत योगी दत्तनाथ महाराज

हिंदू संस्कृतीचे संवर्धन करण्याचे सर्व श्रेय मातृशक्तीला जाते. आपल्या माता आणि भगिनी ह्याच हिंदू धर्माच्या पाया आहेत. भविष्यातही ही संस्कृती चिरंतन ठेवण्यासाठी मन आणि मनगट मजबूत करा, स्वतःच्या संरक्षणाची क्षमता वाढवा,” असे प्रेरणादायी आवाहन धर्मजागरण प्रांत संस्कृती प्रमुख महंत योगी दत्तनाथ महाराज यांनी केले.
भुसावळ जिल्ह्यातील शेंदुर्णी प्रखंडात विश्व हिंदू परिषद (विहिंप) अंतर्गत दुर्गावाहिनीचा दीड दिवसीय प्रशिक्षण वर्ग पार पडला. १२ गावांमधून तब्बल १०० दुर्गांनी या वर्गात उत्साहाने सहभाग नोंदविला.
प्रशिक्षणामध्ये व्यक्तिमत्व विकास, लाठी-काठी प्रशिक्षण, योग-प्राणायाम, नियुद्ध, छुरिका प्रशिक्षण तसेच स्वरक्षणाचे प्रत्यक्ष धडे देण्यात आले.
वर्गाचा शुभारंभ २५ ऑक्टोबर रोजी पारस मंगल कार्यालय, शेंदुर्णी येथे झाला. उद्घाटन प्रसंगी विहिंप देवगिरी प्रांत संघटन मंत्री गणेशजी मोकाशी, भुसावल जिल्हा मातृशक्ती संयोजिका प्रज्ञाताई चौधरी, आणि भुसावल जिल्हा सहमंत्री भिका दादा इंदुरकर उपस्थित होते.
सुरुवात “सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करें… वर्णभेद-मतभेद मिटा कर नव रचना निर्माण करें” या सामूहिक गीताने झाली.प्रातःस्मरण, बौद्धिक सत्र, गीत सराव, चर्चासत्र, कृती सत्र, सायं शाखा, उपासना, रंजन आणि संचलन अशा विविध उपक्रमांनी वर्गाला सर्वांगीण आकार दिला.डॉ. ऐश्वर्या चलवाडे यांनी ‘स्त्री आरोग्य मार्गदर्शन’ विषयावर महिलांना उपयुक्त माहिती दिली.
समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी रेखा काकू झंवर होत्या. प्रमुख अतिथी म्हणून महंत योगी दत्तनाथ महाराज उपस्थित होते.यावेळी दुर्गावाहिनी देवगिरी प्रांत सहसंयोजिका स्नेहल विसपुते, विहिंप भुसावल जिल्हा मंत्री योगेश भंगाळे, संयोजिका मयुरी चौधरी, सहमंत्री डॉ. मनोज विसपुते, श्रद्धा मुळे, आकांक्षा गवळी (मुख्य शिक्षिका), कोमल चौधरी, लोचना चौधरी, विकी दादा भिडे, ह.भ.प. जान्हवी दीदी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रशिक्षण वर्गाच्या यशस्वीतेसाठी भुसावल जिल्हा सहमंत्री भिका दादा इंदुरकर (व्यवस्था प्रमुख), बजरंग दल स्वयंसेवक आणि ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads