जामनेर पोलिसांची कारवाई – घरफोडी करणाऱ्या चोराच्या काही तासातच आवळल्या मुसक्या - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर पोलिसांची कारवाई – घरफोडी करणाऱ्या चोराच्या काही तासातच आवळल्या मुसक्या

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील शहापूर गावात २४ ऑक्टोबरच्या रात्री घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा उलगडा जामनेर पोलिसांनी अवघ्या काही तासांत केला आहे. चोरट्याचा शोध घेऊन त्याला अटक करत पोलिसांनी परिसरात विश्वास आणि सुरक्षा यांचा संदेश दिला आहे.शहापूर येथील सुरेश रामदास डोंगरे यांच्या घरात रात्री अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोख रक्कम, सोन्याचे मणी-मंगळसूत्र आणि मोबाईल असा एकूण ₹74,500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस नेला होता.सकाळी तक्रारदारांनी जामनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाचे चक्र वेगाने फिरवले. काही तासांतच गोपनीय माहितीच्या आधारे संशयित अक्रमशहा (रा. बिस्मिल्ला नगर, जामनेर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरी केलेला ₹74,500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.ही प्रशंसनीय कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम, तसेच जामनेर पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील, पोलीस अधिकारी सचिन महाजन, विशाल लाड, योगेश पाटील, अमोल पाटील, आशा पांचाळ, व चंद्रशेखर नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.


Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads