महाराष्ट्र
समीर शेख प्रतिनिधी
अंत्रोळी येथे उर्स ए गौस ए आजम महेबूब सुहानी ऊरुस उत्सव उत्साहात साजरा....
अंत्रोळी : अंत्रोळी गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही उर्स ए गौस ए आजम महेबूब सुहानी ऊरुस उत्सव अत्यंत श्रद्धा, भक्तीभाव आणि उत्साहात साजरा करण्यात आला.
दिनांक ३ व ४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन दिवस चाललेल्या या धार्मिक उत्सवात सकाळपासून गावात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पहिल्या दिवशी सायंकाळी संदल कार्यक्रमाची भव्य मिरवणुकीने कार्यक्रमास सुरुवात झाली. अंत्रोळी व परिसरातील भाविकांनी सहभाग घेतला. त्यानंतर धार्मिक संदल कार्यक्रम पार पडला. संदल कार्यक्रमानंतर गावातील सर्व समाजबांधवांनी एकत्रित भोजन (महाप्रसाद) घेत सौहार्दाचे दर्शन घडवले. या वेळी हिंदू व मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
या कार्यक्रमाच्या वेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार व पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डांगे व पोलीस प्रशासनाचे व संरपच व उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व समस्त ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्धपणे पार पडला.
या उत्सवाच्या माध्यमातून अंत्रोळी गावाने पुन्हा एकदा धर्मीय एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा सुंदर आदर्श निर्माण केला. उर्स कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. शेवटी सर्व मान्यवर, ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा