तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू
जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथे काल (शुक्रवार) सायंकाळी सुमारास घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. येथील सोनू प्रभाकर सोनवने या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सायंकाळी चार वाजताच्या सुमारास उघडकीस आली.स्थानिक नागरिकांना विहिरीत काहीतरी तरंगताना दिसल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता सोनू सोनवने यांचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला. नागरिकांनी तत्काळ एकत्र येऊन मृतदेह बाहेर काढला आणि जामनेर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला.या घटनेने गंगापुरी गावात शोककळा पसरली असून, सोनूच्या अकस्मात मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून पुढील सविस्तर तपास सुरू केला आहे
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा