शेंदुर्णीत दुर्दैवी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; शहरात शोककळा - दैनिक शिवस्वराज्य

शेंदुर्णीत दुर्दैवी अपघातात दोन तरुणांचा मृत्यू; शहरात शोककळा

जळगाव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 

दसऱ्यानंतरच्या उत्सवी वातावरणावर शोककळा पसरवणारी दुर्घटना शेंदुर्णीत घडली. सोयगाव येथील दुर्गा विसर्जन मिरवणूक पाहून शेंदुर्णीकडे येणाऱ्या आणि शेंदुर्णीतून सोयगावकडे जाणाऱ्या दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात शेंदुर्णी येथील ओम कॉम्प्युटर्सचे संचालक मनोज जोशी यांचा एकुलता एक मुलगा नचिकेत मनोज जोशी (वय १८)विशाल अशोक सूर्यवंशी (वय २५) या दोघांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या भीषण घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे.या अपघाताची बातमी समजताच संपूर्ण शेंदुर्णी शहरात शोककळा पसरली.नचिकेत हा त्रिविक्रम मित्र मंडळाचा सक्रिय सदस्य, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा धारकरी होता. अल्पवयात घरातील एकुलता एक मुलगा अपघातात गमावल्याने जोशी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.दुसरा मृत्यू पावलेला विशाल सूर्यवंशी हा मागील वर्षीच वडिलांच्या निधनाने हादरला होता. आता त्याचाही अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या परिवारावर दुहेरी आघात झाला आहे.या दुर्दैवी अपघातानंतर शेंदुर्णीमध्ये सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.नचिकेत आणि विशाल यांच्या अंत्ययात्रेला हजारो नागरिक, मित्रपरिवार व युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहून अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पन करण्यात आली.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads