महाराष्ट्र
तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत प्रथमोपचार केंद् ; प्रमोद (भाऊ) मोरे यांचा सामाजिक उपक्रम....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर प्रतिनिधी : “सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते” या मंगलमय मंत्रोच्चारांच्या वातावरणात यात्रेचा पवित्र काळ सुरू झाला असून, तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी हजारो भाविक पायी निघाले आहेत. यात्रेकरूंच्या सेवेसाठी लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या स्मरणार्थ लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने मोफत प्रथमोपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे.
या उपक्रमाचे आयोजन मा. प्रमोद (भाऊ) मोरे, कार्याध्यक्ष – लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून, यात्रेकरूंना मार्गातील आरोग्यविषयक अडचणींवर तातडीने मदत मिळावी, हा या उपक्रमामागचा प्रमुख हेतू आहे.
या केंद्रात पायी जाणाऱ्या भक्तांना थकवा, पायात होणाऱ्या जखमा, चक्कर, डिहायड्रेशन, ताप, रक्तदाब, स्नायूंचे ताण, इत्यादी आजारांवर मोफत वैद्यकीय उपचार, औषधे, प्राथमिक बॅंडेजिंग व आरोग्य सल्ला देण्यात येत आहे. सेवाभावी डॉक्टर्स व स्वयंसेवकांची विशेष टीम यात्रेच्या मार्गावर कार्यरत असून, यात्रेकरूंना तत्पर सेवा मिळावी यासाठी दिवस-रात्र कार्य सुरू आहे.
“जनसेवा हिच ईश्वर सेवा” या लोकनेते ब्रह्मानंद मोरे यांच्या कार्यधोरणावर चालत, समाजसेवा प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला आहे. यात्रेकरूंच्या सेवेसाठी कार्य करणे हीच खरी देवसेवा असल्याचे मत मा. प्रमोद (भाऊ) मोरे यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “भक्तांच्या आरोग्याचे रक्षण करणे हेच आपले कर्तव्य आहे. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या प्रत्येक भाविकाला सुरक्षित व निरोगी यात्रेचा अनुभव मिळावा, हीच आमची प्रार्थना आहे.”
या मोफत प्रथमोपचार केंद्रामुळे अनेक यात्रेकरूंना दिलासा मिळत असून, नागरिकांकडून या समाजोपयोगी उपक्रमाचे मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. लोकनेते स्व. ब्रह्मानंद मोरे यांच्या समाजसेवेच्या परंपरेतून उभ्या राहिलेल्या या कार्यामुळे “जनसेवा हिच ईश्वर सेवा” हे तत्व प्रत्यक्ष कृतीत उतरल्याचे दृश्य यात्रेकरूंना पाहायला मिळत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा