पिंपळगाव गोलाईजवळ मध्यरात्री भीषण अपघात; चार तरुणांचा जागीच मृत्यू – जामनेरमध्ये हळहळ
जामनेर दि.—जामनेर तालुक्यातील पिंपळगाव गोलाईजवळ काल रात्री सुमारे 10.30 ते 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात चार तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर येथील चार तरुण पहूरहून मोटारसायकलवरून जामनेरकडे परत येत होते. त्याच वेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पीकअप बुलेरो वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की चारही तरुणांनी घटनास्थळीच प्राण सोडले.
मृत तरुणांची नावे पुढीलप्रमाणे
अंकुश लोखंडे (वय 24) – रा. भीमनगर
अतुल सुरवाडे (वय 22) – रा. भीमनगर
रवि लोंढे (वय 20)
अजय (वय 25)
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. पोलिसांनीही घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी – नातेवाईकांचा आक्रोश
मृतदेहांना तात्काळ जामनेर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश, आर्त विलाप आणि शोकमय वातावरण पाहायला मिळाले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून रुग्णालयात मोठी गर्दी उसळली होती.पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या हृदयद्रावक अपघातामुळे जामनेर व परिसरात शोककळा पसरली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा