मालदाभाडी हायस्कूल येथे संविधानाचा जागर - दैनिक शिवस्वराज्य

मालदाभाडी हायस्कूल येथे संविधानाचा जागर

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर: येथून जवळच असलेल्या न्यू इंग्लिश स्कूल, मालदाभाडी या शाळेत संविधान दिना निमित्त जागर संविधानाचा या कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थी,पालक, शिक्षक व समाज यांना एकत्र आणत आपल्या भावी पिढीत संविधानिक मूल्यांचे बीजारोपण करण्याच्या हेतूने मानवी साखळी, योगासनाच्या माध्यमातून अडिचशे विद्यार्थ्यांना घेऊन संविधान हे नाव तयार करण्यात आले. सकाळच्या प्रहरात जनजागृती हेतू प्रभात फेरी, विद्यार्थ्यांच्या ज्ञानवृद्धी हेतू प्रश्नमंजुषा असे कार्यक्रम आयोजित केले होते. आपले संविधान - आपला अभिमान या विषयावर विजय सैतवाल यांनी माहिती दिली. 
विविध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. आर. शिकोकार सर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोळी यांनी केले. तर आभार नितीन पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ. के. आर. महाजन, ए. बी. पाटील, जी.टी.पाटिल, एन.जी पाटील, राजु मोरे, मनोजकुमार जैन, श्रेया कापसे, जागृती बोरसे, प्रतीक्षा खराटे, भूमिका उंबरकर, सोनल चौधरी, दिव्या उंबरकर, संदेश खुरपडे, विराज जंगले, गौरव बोरसे, रामेश्वर पिठोडे, मनोज श्रीखंडे यांनी परिश्रम घेतले
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads