महाराष्ट्र
प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर यांच्या कार्यालयात 9 डिसेंबर रोजी डाक अदालत होणार....
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : देशातील टपाल सेवा ही सर्वसामान्यांच्या सामाजिक-आर्थिक व्यवहाराचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. नागरिकांना सेवा देताना काही त्रुटी उद्भवतात व त्याबाबत तक्रारी नोंदवल्या जातात. अशा तक्रारींच्या निवारणासाठी पोस्ट विभागामार्फत आयोजित करण्यात येणारी डाक अदालत आता पुन्हा सोलापूरमध्ये भरवली जाणार आहे.
प्रवर अधीक्षक डाक कार्यालय, सोलापूर विभाग (सोलापूर हेड पोस्ट ऑफिस पाठीमागे) यांच्या वतीने 9 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 11.30 वा. प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर यांच्या कार्यालयात 121 वी डाक अदालत पार पडणार आहे.
---
तक्रारींची दखल
सहा आठवड्यांपासून न सोडवलेल्या किंवा समाधानकारक उत्तर न मिळालेल्या तक्रारींचा विचार केला जाईल.
टपाल, स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू, पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर यांसंबंधीच्या तक्रारींस प्राधान्य.
तक्रारींमध्ये तारीख, संबंधित अधिकाऱ्याचे नाव व पद यांसह सर्व तपशील नमूद करणे आवश्यक.
---
तक्रार कशी करावी?
संबंधितांनी आपली तक्रार दोन प्रतींसह
हेमंत खडकेकर, प्रवर अधीक्षक डाकघर,
सोलापूर विभागीय कार्यालय, सोलापूर – 413001
यांच्या नावे 6 डिसेंबर 2025 पर्यंत पाठवावी.
यानंतर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, अशी माहिती प्रवर अधीक्षक डाकघर, सोलापूर यांनी दिली
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा