जामनेर : सोना पेट्रोल पंप समोरील अंबिका गॅरेजला भीषण आग; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला
जामनेर – शहरातील सोना पेट्रोल पंपासमोर असलेल्या अंबिका गॅरेजमध्ये आज रात्री अचानक भीषण आग लागली. काही क्षणांतच आगीने प्रचंड रौद्ररूप धारण केले आणि गॅरेजमधील साहित्य, वाहनांचे पार्टस, तेलकट माल उंच ज्वाळांनी पेट घेऊन जळून खाक झाले.
आगीच्या प्रचंड धुराचे लोट आकाशात झेपावताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले. दुकानांचे शटर वितळून पडण्याइतकी आग भयंकर होती.
घटनेची माहिती मिळताच जामनेर नगरपालिका अग्निशामक दल, तसेच स्थानिक तरुणांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. काही काळाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर आग यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली असून, मोठा अनर्थ टळला आहे.
सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळते.
आग नेमकी कशी लागली? – याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिस व अग्निशमन दलाने याबाबत तपास सुरू केला आहे.या आगीत अंबिका गॅरेजचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा