70 वर्षांचा नराधम अन् 10 वर्षांची चिमुकली… समाजाला हादरवणारी घटना
सटाणा तालुक्यातील खमताने गावी घडलेली घटना म्हणजे संपूर्ण मानवतेला काळीमा फासणारी असून नाभिक समाजात तळागाळात संतापाची लाट उसळली आहे.
70 वर्षीय नराधमाने केवळ 10 वर्षीय निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून माणुसकीचं भयावह दर्शन घडवलं आहे.या अमानवी, घृणास्पद कृत्याने संपूर्ण समाज हादरून गेला आहे.अश्या नराधमाला फाशी देण्यात यावी अशी मागणी जामनेर तालुका श्री.संत सेना महाराज बहुद्देशीय संस्थेच्या वतीने पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.सविस्तर वृत्त असे की,सटाणा तालुक्यातील खमताने या गावातील एका 70 वर्षीय नराधम इसमाने नाभिक समाजाच्या 10 वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करत त्या चिमुकलीला अत्यंत शारीरिक पिडा,त्रास दिल्याची घटना उघडकीस आली असून या निंदनीय घटनेमुळे राज्यातील संपूर्ण नाभिक समाजात संतापाची लाट उसळली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.अश्या राक्षसी प्रवृत्तीच्या नराधमाला न्यायदेवतेने कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी राज्य भरातील नाभिक समाजाच्या वतीने ठिक ठिकाणी निवेदन देऊन या घटनेचा निषेध नोंदविला जात आहे.या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ जामनेर तालुका श्री.संत सेना बहुद्देशीय संस्थेच्या वतीने जामनेर पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.पोलीस प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,अशा नराधमाला जिवंत ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही, त्याला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी,जेणे करून भविष्यात अश्या प्रकारचे दुष्कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही.अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली नाही तर अशा घटना थांबणार नाहीत,असा इशाराही देण्यात आला.आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करून जलदगती न्याय प्रक्रिया राबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.पीडित चिमुकली व तिच्या कुटुंबाला तातडीने संरक्षण,उपचार व न्याय मिळावा,अशीही मागणी करण्यात आली.निवेदन देतेवेळी श्री. संत सेना बहुद्देशीय संस्थेचे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा कार्याध्यक्ष~चंद्रकांत शिंदे,महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा युवक अध्यक्ष~अनिल शिंदे, शहराध्यक्ष~ वसंतराव साळुंखे,तालुका युवक अध्यक्ष~जयवंत पर्वते,युवक शहराध्यक्ष~नाना पवार,जामनेर शहर दुकानदार संघटना अध्यक्ष~कैलास वाघ यांच्या सह शिवाजी शिंदे,रमाकांत पर्वते,ईश्वर साळुंखे,विश्वास पर्वते,श्रावण बोडरे,शिवाजी निकम,प्रविण निकम,गजानन पवार,कैलास राऊत,आत्माराम शिंदे,शिवाजी दांडेकर,यश पर्वते,संतोष भिडे,भगवान पवार, सोपान महाले,देविदास राऊत,ज्ञानेश्वर शिंदे यासह नाभिक समाजाचे समाजबांधव, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.न्याय मिळालाच पाहिजे”, “नराधमाला फाशी द्या” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडण्यात आला.
दोषींना कडक शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही संस्थेच्या वतीने देण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा