रावसाहेब परिक्षाळे यांची आर.पी.आय. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड..... - दैनिक शिवस्वराज्य

रावसाहेब परिक्षाळे यांची आर.पी.आय. महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी बिनविरोध निवड.....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर.पी.आय.) पक्षाच्या संघटनात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरलेल्या बैठकीचे आयोजन हॉटेल सोना, होटगी रोड येथे करण्यात आले. या बैठकीत पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी रावसाहेब परिक्षाळे यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
     नवीन जबाबदारीचे अधिकृत निवडीपत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जककप्पा कांबळे यांच्या हस्ते रावसाहेब परिक्षाळे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी त्यांचा शाल, पुष्पहार व सत्कार करून गौरव करण्यात आला.
    या निवडीनंतर बोलताना रावसाहेब परिक्षाळे यांनी रिपब्लिकन विचारधारेचा वारसा जपत पक्षवाढ, संघटन बळकटीकरण व तळागाळातील जनतेपर्यंत पक्ष पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे व निष्ठेने कार्य करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक न्याय, समता व संविधानिक मूल्यांसाठी पक्ष अधिक मजबूत करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
    या महत्त्वपूर्ण कार्यक्रमास पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. रावसाहेब परिक्षाळे यांच्या निवडीमुळे राज्यातील पक्ष संघटन अधिक गतिमान होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads