BREAKING: जामनेरच्या निलेशचा खून; मित्रच निघाले मारेकरी! जळगाव हादरलं! फायनान्स वादातून तरुणाचा गळा आवळून खून रात्री बेपत्ता, सकाळी मृतदेह; जामनेर प्रकरणाने खळबळ - दैनिक शिवस्वराज्य

BREAKING: जामनेरच्या निलेशचा खून; मित्रच निघाले मारेकरी! जळगाव हादरलं! फायनान्स वादातून तरुणाचा गळा आवळून खून रात्री बेपत्ता, सकाळी मृतदेह; जामनेर प्रकरणाने खळबळ

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर शहरातील दत्त चैतन्य नगर येथील १५ डिसेंबरपासून बेपत्ता असलेला निलेश राजेंद्र कासार (वय ३० वर्ष) याचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून, शुक्रवारी सकाळी शिरसोलीजवळील नेव्हरे धरणातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेमुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
पोलीस तपासात एलटीआय फायनान्स कंपनीतील कामकाजाच्या वादातूनच हा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मयत निलेशचे मित्र असलेले दिनेश चौधरी (वय २०, रा. तळई, ता. एरंडोल) व भूषण पाटील (वय २०, रा. पिंपरी, ता. चोपडा) यांनी फायनान्स मंजुरीच्या निमित्ताने निलेशला शिरसोली येथे बोलावले होते.

काही दिवसांपूर्वी निलेश कासार व भूषण पाटील यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हाच जुना वाद मनात ठेवून दोघांनी निलेशचा दोरीने गळा आवळून निर्घृण खून केला. खून केल्यानंतर मृतदेह पोत्यात टाकून नेव्हरे धरणात फेकून दिल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

या प्रकरणाचा तपास करताना जळगाव एमआयडीसी पोलिसांनी कॉल डिटेल्सच्या आधारे संशयितांचा माग काढला. संशयित आरोपींना ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान, निलेश हा तरुण दि. १५ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेपासून जळगाव येथून बेपत्ता झाला होता. त्यानंतर शिरसोली रोडवरील रामदेववाडी परिसरात त्याची मोटारसायकल आढळून आली होती, मात्र निलेशचा कोणताही ठावठिकाणा लागत नव्हता. बेपत्तापासून त्याचा मोबाईल फोन बंद असल्याने नातेवाईकांची चिंता अधिकच वाढली होती.

या प्रकरणी निलेशच्या नातेवाईकांनी जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती, त्यानुसार पोलीस विविध अंगांनी तपास करत होते. अखेर आज सकाळी नेव्हरे धरणातून मृतदेह आढळून आल्यानंतर आवश्यक तपासाअंती तो मृतदेह निलेश कासारचाच असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेनंतर रुग्णालयात निलेशच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू असून, जळगाव जिल्ह्यात पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एमआयडीसी पोलीस पुढील तपास करत आहेत.


Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads