धक्कादायक! जामनेर येथील बेपत्ता तरुणाचा खून;शिरसोलीजवळ जंगलात पोत्यात मृतदेह आढळला
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर दत्त चैतन्य नगर येथील चि. निलेश राजेंद्र कासार या तरुणाच्या बेपत्ताबाबत सुरू असलेल्या शोध मोहिमेला आज धक्कादायक वळण मिळाले आहे. शिरसोली परिसरातील जंगलात एका पोत्यात निलेश कासार याचा मृतदेह आढळून आला असून, त्याचा निर्घृण खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मृतदेह पोत्यात टाकून जंगल परिसरात धरणात फेकून दिल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून, या घटनेने जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.व मृतदेह बाहेर काढण्यात आले.
याआधी निलेश कासार हा तरुण दि. 15 डिसेंबरपासून बेपत्ता होता, त्याची मोटारसायकल शिरसोली रोड रामदेववाडी परिसरात सापडली होती, तर मोबाईल फोन बंद असल्याने संशय अधिक गडद झाला होता. अखेर आज जंगलात पोत्यात मृतदेह सापडल्याने या प्रकरणाचा उलगडा झाला, मात्र कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.घटनेचा तपास जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत असून, लवकरच या प्रकरणातील सर्व बाबी उघड होतील, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा