महाराष्ट्र
जनतेच्या विकासासाठी व न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी :- सुप्रिया ताई गायकवाड
समीर शेख प्रतिनिधी
पंढरपूर (भाळवणी) : स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी काम करण्याच्या उद्देशाने, भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार म्हणून सुप्रिया ताई गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर करताना त्यांनी सांगितले की, "आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या विकासासाठी आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी माझे योगदान राहील."
सुप्रिया ताई गायकवाड यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाळवणी येथील मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी धोंडेवाडीचे माजी सरपंच प्रकाश देठे, आमदार अभिजीत पाटील यांचे कट्टर समर्थक जोतिनाना देठे, महादेव उत्तम देठे, रवी देठे, डॉ. राजाभाऊ देठे, मंगेश देठे, माजी सरपंच राजाराम पाटील, शंकर देठे, महादेव पवार, माजी संचालक विलास नाना देठे, माजी सरपंच संभाजी राजे देठे, बापू गायकवाड, संतोष कांबळे, गौतम गायकवाड, विशाल गायकवाड आणि धोंडेवाडीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"जनतेच्या विश्वासावर काम करू" – सुप्रिया ताई गायकवाड
उमेदवारी जाहीर करताना सुप्रिया ताई गायकवाड यांनी जनतेला आश्वस्त केले की, "माझ्या उमेदवारीचे मुख्य उद्देश म्हणजे जनतेच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे. आपल्या सर्वांचा विश्वास मिळवून त्यावर ठामपणे काम करणार आहे."
आमदार अभिजीत पाटील यांचे मार्गदर्शन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली भाळवणी गटातील जनतेला उत्तम सेवा देण्याची खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा