महाराष्ट्र
कासेगाव–वडजीत शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन ; धनेशजी आचलारे–अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ जनसागर !
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर (बोरामणी) : सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर बोरामणी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धनेशजी आचलारे व पंचायत समिती उमेदवार अप्पा धनके यांच्या प्रचारार्थ मौजे कासेगाव व वडजी येथे भव्य कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत शिवसेनेने जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचाराला वेग दिला.
या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. बैठकीस शिवसेना, युवासेना, कामगार सेना यांचे पदाधिकारी, शिवसैनिक, माता-भगिनी व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्गदर्शन करताना अमोल शिंदे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. “लाडकी बहीण योजना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केली. मात्र काही जण आज या योजनेचे श्रेय लाटून जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेला आता सत्य समजले असून, त्यामुळेच विरोधक शिवसेनेसह उमेदवारांसमोर हतबल झाले आहेत,” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी मतदारांना आवाहन केले की, “बोरामणी गटाच्या सर्वांगीण विकासासाठी धनेशजी आचलारे व अप्पा धनके यांना भरघोस मतदान करा. शिवसेना ही केवळ आश्वासन देणारी नाही, तर काम करून दाखवणारी ताकद आहे.”
या कॉर्नर बैठकीत ‘धनुष्यबाण’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. माता-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद व तरुणांचा जोश पाहता बोरामणी गटात शिवसेनेची भक्कम पकड अधिक मजबूत होत असल्याचे चित्र दिसून आले. कासेगाव व वडजीतील या प्रचार सभेमुळे शिवसेना उमेदवारांच्या विजयाचा आत्मविश्वास दुणावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा