“दक्षिण सोलापुरात भाजपचा रणसंग्राम! पंकजा मुंडे यांची आज मंद्रूप व कुंभारीत जाहीर सभा...” - दैनिक शिवस्वराज्य

“दक्षिण सोलापुरात भाजपचा रणसंग्राम! पंकजा मुंडे यांची आज मंद्रूप व कुंभारीत जाहीर सभा...”


समीर शेख प्रतिनिधी 
 सोलापूर (मंद्रूप) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराला अधिक बळ देण्यासाठी राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे आज (मंगळवारी) सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप आणि कुंभारी येथे जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
   मंत्री पंकजा मुंडे यांचे आज सायंकाळी ५.४५ वाजता सोलापूर विमानतळावर आगमन होणार असून, त्यानंतर सायंकाळी ६.१५ वाजता मंद्रूप येथे त्यांची पहिली जाहीर सभा होईल. यानंतर सायंकाळी ७.३० वाजता कुंभारी येथे दुसरी जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे.
या सभांचे नियोजन भाजपचे जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी या सभांना विशेष महत्त्व आहे. या दोन्ही जाहीर सभांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads