भक्ती, श्रद्धा आणि एकोपा : अंत्रोळीतील मायका देवी यात्रा संपन्न... - दैनिक शिवस्वराज्य

भक्ती, श्रद्धा आणि एकोपा : अंत्रोळीतील मायका देवी यात्रा संपन्न...


 समीर शेख प्रतिनिधी 
अंत्रोळी : अंत्रोळी येथील ग्रामदैवत मायका देवीची वार्षिक यात्रा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भक्तीभावात व उत्साहात पार पडली. यात्रेनिमित्त संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते.
    रविवारी सकाळी पारंपरिक बिरोबा–मायका भेट विधी पार पडला. सायंकाळी भाविकांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सोमवारी सर्व ग्रामस्थांच्या वतीने देवीस नैवेद्य अर्पण करण्यात आला. सायंकाळी विधीवत पूजा व आरती संपन्न होऊन त्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
   या यात्रेत ग्रामस्थांसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यात्रेच्या आयोजनासाठी ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads