महाराष्ट्र
कर्तव्य, कष्ट आणि कटाक्ष! पोलीस कर्मचारी भागवत शिंदेंची ‘भारत श्री’ स्पर्धेत देशात पाचवी कामगिरी ...
समीर शेख प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी भागवत शिंदे यांनी राष्ट्रीय स्तरावरील ४०+ ‘भारत श्री’ मास्टर्स शरीरसौष्ठव स्पर्धेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी देशात पाचवा क्रमांक पटकावून सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
पोलीस खात्यातील धकाधकीच्या व जबाबदारीच्या कामातून वेळ काढत, शिस्तबद्ध सराव व कठोर मेहनतीच्या जोरावर शिंदे यांनी ही उल्लेखनीय कामगिरी केली. कर्तव्य आणि छंद यांचा उत्तम समतोल साधत त्यांनी तरुणांसमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
विशेष म्हणजे, भागवत शिंदे यांची सुकन्या देखील राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पदक मिळवून चमकदार यश संपादन केल्याने शिंदे कुटुंबाच्या क्रीडा परंपरेचा गौरव अधिकच वाढला आहे.
या यशाबद्दल सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनचे अध्यक्ष संतोष भाऊ पवार व सरचिटणीस विशाल गायकवाड यांनी शिंदे यांचे विशेष अभिनंदन केले आहे. तसेच पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा