बातमीची दखल – शेंगोळा गावात तातडीने स्वच्छता मोहीम सुरू
जामनेर तालुक्यातील शेंगोळा गावात पसरलेल्या घाणीच्या साम्राज्यावर ‘शिवस्वराज न्यूज’ ने काही दिवसांपूर्वी ठळकपणे प्रकाश टाकला होता. “गावात घाणीचे साम्राज्य – नागरिकांचे आरोग्य धोक्यात” या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.
बातमी प्रकाशित होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेत ग्रामपंचायत शेंगोळा यांना आदेश दिले. ग्रामसेवक व सरपंच यांना गावातील सर्व ठिकाणी तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या. आदेश मिळताच ग्रामपंचायत प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. गावातील रस्ते, गटारी व सार्वजनिक ठिकाणी जिथे जिथे घाणीचे साम्राज्य पसरले होते, त्या सर्व ठिकाणी कामगार लावून साफसफाई करण्यात आली. सरपंच व ग्रामसेवक स्वतः उपस्थित राहून स्वच्छतेची कामे करून घेत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.गावातील नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून माध्यमांनी प्रश्न मांडल्यामुळे प्रशासन जागे झाल्याची भावना व्यक्त केली आहे. मात्र, केवळ तात्पुरती स्वच्छता मोहीम राबवून प्रश्न संपणार नाही, हेही तितकेच खरे आहे. पुढील काळात गावात पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी ग्रामपंचायतीने नियमित आणि कायमस्वरूपी स्वच्छतेची ठोस व्यवस्था करणे आवश्यक आहे.अन्यथा, भविष्यात पुन्हा घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यास ‘शिवस्वराज न्यूज’ ची नजर शेंगोळा गावाकडे कायम राहील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा