जामनेर तालुक्यातील गोंडखेड सरपंचावरील अविश्वास ठराव गावकऱ्यांनी फेटाळला.उपसरपंचासह सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव. - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्यातील गोंडखेड सरपंचावरील अविश्वास ठराव गावकऱ्यांनी फेटाळला.उपसरपंचासह सदस्यांनी दाखल केला होता अविश्वास ठराव.

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यातील गोंडखेड येथे उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव ग्रामसभेत बहुमताने फेटाळण्यात आला. त्यामुळे गोंडखेड सरपंचपदी विठ्ठल सोन्ने कायम राहिले आहेत. विठ्ठल सोन्ने हे गेल्या २०२३ पासून लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यांच्यावर मनमानी कारभार करतात असा आरोप करीत उपसरपंच गणेश कोळी यांचे सह आठ सदस्यांनी लोकनियुक्त सरपंच विठ्ठल विश्वनाथ सोन्ने यांचे विरुद्ध जामनेर तहसीलदारांकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. तहसील कार्यालयात हा ठराव बहुमताने मंजूर झाला असला तरी लोकनियुक्त असल्याने याबाबत विशेष ग्रामसभेत हा ठराव पारित होणे गरजेचे असते. त्यासाठी तहसीलदार नानासाहेब
आगळे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी गोंडखेड येथे विशेष सभेचे आयोजन करण्यात येऊन मतदान घेण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक एम एम कासार यांचे सह महसूल व पोलिस प्रशासनातील कर्मचारी उपस्थित होते. 
सरपंचांना बहुमत
 गोंडखेड गावचे एकूण मतदान १६४२ आहे. पैकी १३७४ मतदान होऊन अविश्वास ठरावाच्या बाजूने फक्त ४८२ मतदान झाले. तर सरपंचांच्या बाजूने ८३६ मतदान होऊन सरपंचांवरील अविश्वास ठराव बहुमताने फेटाळण्यात आला. ठराव फेटाळल्याचे जाहीर होताच गावातून रात्री जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावरून गावकरी सरपंचाच्या बाजूने उभे असल्याचे व सरपंचाने गावाच्या विकासासाठी काम केल्याचे सिद्ध झाले असून सदस्यांनी सरपंचाला केलेला विरोध गावकऱ्यांनी फेटाळून लावला असून गावकऱ्यांनी पुन्हा विकास पुरुषाला निवडून दिले असल्याच्या भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads