जामनेर : पाच वर्षांच्या इफजने ठेवला रमजानचा रोजा; सर्वत्र कौतुक
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर : येथील भारतीय जनता पक्षाचे (भाजप) कार्यकर्ते फिरोज सय्यद यांची अवघ्या पाच वर्षांची कन्या इफज फिरोज सय्यद हिने पवित्र रमजान महिन्यात रोजा (उपवास) ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इतक्या लहान वयात तब्बल १३ तास उपवास पूर्ण केल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.मुस्लीम बांधवांसाठी रमजान महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात रोजा ठेवून संयम, श्रद्धा आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला जातो. लहान इफज हिनेही मोठ्यांप्रमाणे रोजा पाळण्याचा निर्धार केला आणि पूर्ण दिवस उपवास करून आदर्श घालून दिला.
इफजच्या या कृतीमुळे सय्यद कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिक तिचे अभिनंदन करत आहेत. एवढ्या लहान वयात धार्मिक संस्कार जोपासल्याबद्दल तिच्या पालकांचेही कौतुक केले जात आहे.रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर इफजसारख्या चिमुकल्यांकडून मिळणारा श्रद्धा आणि संयमाचा संदेश समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा