जामनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा; प्रा. डॉ. प्रमोद निकम यांना पीएचडी पदवी प्रदान - दैनिक शिवस्वराज्य

जामनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा; प्रा. डॉ. प्रमोद निकम यांना पीएचडी पदवी प्रदान

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
जामनेर तालुक्यासह कळमसरा (ता. पाचोरा, जि. जळगाव) परिसरासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. कळमसरा येथील मूळ रहिवासी असलेले प्राध्यापक डॉ. प्रमोद चंद्रभान निकम यांनी शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय संशोधन करत पीएचडी ही सर्वोच्च शैक्षणिक पदवी संपादन केली आहे.
सध्या PES College of Engineering, Aurangabad येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. निकम यांनी इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी या विषयात सखोल संशोधन पूर्ण करून पीएचडी प्राप्त केली. त्यांच्या या संशोधन कार्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात मोलाची भर पडली असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत.
पीएचडी पदवी प्रदान समारंभ आज मुंबई येथे उत्साहात पार पडला. या यशामागे कष्ट, जिद्द आणि कुटुंबीयांचे पाठबळ असल्याचे डॉ. निकम यांनी सांगितले. ते कळमसरा येथील श्री. चंद्रभान ओंकार निकम (सेवानिवृत्त कंडक्टर) व सौ. निर्मला चंद्रभान निकम (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचे सुपुत्र असून श्री. संदीप चंद्रभान निकम (ग्रामविकास अधिकारी) यांचे मोठे बंधू आहेत.
यशाबद्दल बोलताना डॉ. निकम यांनी आपल्या आई-वडिलांचे संस्कार, भाऊ-बहीण व पत्नीचे सहकार्य यांना संपूर्ण श्रेय दिले. तसेच मार्गदर्शक प्राचार्य, सहकारी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच हे यश शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. प्रमोद चंद्रभान निकम यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल कळमसरा गावातील डॉ. जीवन कटारिया, सौ. वंदनाताई चौधरी, संजय उशीर (माजी सरपंच), सौ. रत्नताई चौधरी (माजी सरपंच), डॉ. निंबाळकर, सुनील कडूबा निकम, गोविंदा ओंकार निकम, विनोद देवचंद निकम, प्रा. गौतम निकम, बापू झीपरू निकम, माधव पंडित पाटील, विजय सुरवाडे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुक केले.
तसेच महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार Girish Mahajan यांनी विशेष अभिनंदन करत त्यांच्या संशोधन कार्याचे कौतुक केले. जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांनीही डॉ. निकम यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभाशिर्वाद दिले.
डॉ. प्रमोद निकम यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जामनेर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून परिसरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads