पाचोरा बसस्थानक परिसरात खिसेकापू प्रकरणी जामनेर तालुक्यातील तीन महिला ताब्यात; ३२,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
पाचोरा बसस्थानक परिसरात गर्दीचा फायदा घेत प्रवाशांचे खिसे कापणाऱ्या महिलांचा टोळीला जेरबंद करण्यात पाचोरा गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन महिलांना ताब्यात घेवून, त्यांच्याकडून 32 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये वडगांव खुर्द येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक श्रावण ताराचंद पाटील हे पाचोरा बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या खिशातून 13 हजार 400 रुपये चोरीस गेले होते. याबाबत पाचोरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक २३ फेब्रुवारी सोमवार रोजी पाचोरा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी राहुल शिंपी, शरद पाटील आणि श्रीराम शिंपी यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, बसस्थानक परिसरात संशयीत तीन महिला फिरत असल्याबाबत माहिती मिळाली, तात्काळ पथकाने सापळा रचून तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांनी त्यांची चौकशी केली असता, महिलांनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या संशयित महिलांमध्ये
निर्मला सुनील जोशी (वय ३३, राहणार गंगापुरी, जामनेर
सोनाली गणेश विधाते (वय २४, राहणार हिसोडा खुर्द, जालना, हल्ली मुक्काम कुंभारी, जामनेर
उषाबाई तेजराव ऐकणार (वय ५५, राहणार कुंभारी, जामनेर यांची महिला पोलीस अंमलदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या अंगझडतीत 32, हजार 400 रुपये रोख मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून सदरची रक्कम ही जप्त केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी करत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार तसेच पोलीस कर्मचारी राहुल शिंपी, अशोक हटकर, शरद पाटील, श्रीराम शिंपी, प्रियंका आहेर तसेच होमगार्ड सोनाली शशीकांत पाटील,कल्पना तानाजी निंबाळकर,संगीता मुरलीधर पाटील यांनी पार पाडली आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा