जामनेरात नगराध्यक्षा साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते विकासकामांचा भूमिपूजन सोहळा
जामनेर शहरातील शास्त्री नगर भागातील सिद्धार्थ हाउसिंग सोसायटी परिसरातील अंतर्गत रस्ते व गटार बांधकाम कामांचे भूमिपूजन सोहळा आज सकाळी उत्साहात पार पडले. जामनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा साधनाताई गिरीश महाजन यांच्या हस्ते विधिवत पूजा करून या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा करण्यात आला.
या प्रसंगी उपनगराध्यक्ष डॉ. प्रशांत भोंडे, मुख्याधिकारी नितीन बागुल, गटनेता संध्या जितेंद्र पाटील, बांधकाम सभापती अतिश छगन झाल्टे, सभापती तेजस पाटील, सुहास पाटील, श्रीराम महाजन, स्वप्ना रविंद्र झाल्टे, दत्तू नामदेव जोहरे, उज्वला दीपक तायडे, पूजा सुभाष पवार, उज्वला मुकुंदा सुरवाडे, प्रतिभा जितेश पाटील, शितल गोकुळ माळी, माधुरी गजानन कचरे, सुरेखा सुनील पाटील, निलिमा राहुल पाटील, किलुबाई गिमल्या शेवाळे, वेणुबाई रमेश माळी, दिपक प्रवीण डांगी आदी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विकासकामांमुळे परिसरातील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते आणि सुसज्ज गटार व्यवस्था उपलब्ध होणार असून पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या दूर होणार आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य केले असून भूमिपूजन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.यावेळी कार्यक्रम सोहळ्याला परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा