तेलंगणातील विटंबनेचा जामनेरमध्ये निषेध क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अवमानाविरोधात बहुजन समाजाचा मोर्चा - दैनिक शिवस्वराज्य

तेलंगणातील विटंबनेचा जामनेरमध्ये निषेध क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्याच्या अवमानाविरोधात बहुजन समाजाचा मोर्चा

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
तेलंगणा राज्यात  क्रांतिसूर्य महात्मा  ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची समाजकंटकांकडून करण्यात आलेल्या विटंबनेच्या घटनेचा जामनेर तालुक्यात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद, सत्यशोधक समाज संघ, शिव-फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेला मानणाऱ्या विविध वैचारिक संघटनांच्या वतीने जामनेरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला.
मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत सर्व कार्यकर्त्यांनी एकजूट दर्शवली. पुढे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने जामनेर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात संबंधित समाजकंटकांवर कठोर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करण्यात यावी व अशा विकृत मानसिकतेच्या लोकांवर कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. “महात्मा फुले यांच्या विचारांवर आणि प्रतिमेवर हल्ला म्हणजे संपूर्ण बहुजन समाजाच्या स्वाभिमानावर आघात आहे,” अशा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी समता फुले परिषदेचे जिल्हा कार्याध्यक्ष पवन माळी, क्षत्रीय माळी समाजाचे अध्यक्ष प्रा. उत्तमराव पवार सर, नगरसेवक अतिश झाल्टे, महिंद्र बाविस्कर, बाबुराव अण्णा घोंगडे, अरुण महाजन, ए. डी. माळी सर, एस. पी. महाजन सर, प्रल्हाद बोरसे, राजू जाधव (पहूर उपसरपंच), सत्यशोधक समाज संघाचे रमेश दादा वराडे, कैलास महाजन सर, जे. बी. चौधरी सर, गोर बंजारा क्रांती संघाचे धनराज चव्हाण सर, माळी महासंघाचे राजू जगताप, गजानन अहीरे, समाजसेवक सारंगधर अहीरे, बाळू चवरे सर, योगेश झाल्टे, दीपक माळी सर यांच्यासह जामनेर तालुक्यातील बहुजन समाजातील फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मोर्चादरम्यान घोषणाबाजी करत दोषींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. जामनेरमध्ये शांततेत पण ठामपणे हा निषेध व्यक्त करण्यात आला असून, प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads