सोलापूर जिल्ह्यात युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नवी कार्यकारिणी जाहीर.... उमेश चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी तर श्रीकृष्ण कोळी यांची सचिवपदी एकमताने निवड.... - दैनिक शिवस्वराज्य

सोलापूर जिल्ह्यात युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाची नवी कार्यकारिणी जाहीर.... उमेश चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी तर श्रीकृष्ण कोळी यांची सचिवपदी एकमताने निवड....


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर : माध्यमिक स्तरावरील शारीरिक शिक्षण विषयाची गुणवत्ता उंचावण्यासाठी व शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र राज्य युवा शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ संचलित सोलापूर जिल्हा माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
    या निवड प्रक्रियेत उमेश चव्हाण यांची जिल्हाध्यक्षपदी, तर श्रीकृष्ण कोळी यांची सचिवपदी एकमताने निवड झाली. नव्या पदाधिकाऱ्यांकडून संघटनेचे काम अधिक गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
      कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी मनीष नाईकनवरे व नागेश पाटील, कार्याध्यक्षपदी सचिन गोतसूर्य, सहसचिवपदी अमोल मिरगणे व नेताजी पवार, तर खजिनदारपदी राजेंद्र चव्हाण यांची निवड करण्यात आली.
     जिल्हा संघटक म्हणून शुभम तकिक, अमोल पवार, अहमद मुलाणी, सोमनाथ चव्हाण व किशोर सुळ यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच तात्यासाहेब साठे, विजय दत्तू, राहुल हजारे, प्रशांत बाबर, जितेंद्र भालेराव, वैभव राऊत, रोहित सुरवसे, प्रदीप शिर्के व आनंद देशपांडे यांची जिल्हा सदस्यपदी निवड झाली.
जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी नामदेव खारे, तर प्रसिद्धी सचिवपदी पंचाक्षरी स्वामी व श्याम आरगडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे येथील मुख्यालयातून राज्यभर कार्यकारिणी निवड प्रक्रिया सुरू असून, त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्याची निवड पार पडली. ही प्रक्रिया संस्थापक संदीप मनोरे, राज्य सचिव प्रा. तायाप्पा शेंडगे, जिल्हा मार्गदर्शक प्रदीप नवले व अंकुश आडकिले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
      नव्या कार्यकारिणीचे जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक व क्रीडाप्रेमींनी स्वागत करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads