27 वर्षांनी उजळल्या शाळेच्या आठवणी ; 1998-99 बॅच एकत्र, कंदलगावात ‘जीवन ज्योत प्रशालेत ’ बॅचचा जल्लोषात स्नेहमेळावा!. - दैनिक शिवस्वराज्य

27 वर्षांनी उजळल्या शाळेच्या आठवणी ; 1998-99 बॅच एकत्र, कंदलगावात ‘जीवन ज्योत प्रशालेत ’ बॅचचा जल्लोषात स्नेहमेळावा!.


समीर शेख प्रतिनिधी 
कंदलगाव : जुन्या आठवणी, मैत्रीचा गहिवर आणि गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा भावस्पर्शी क्षण कंदलगावात अनुभवायला मिळाला. येथील जीवन ज्योत प्रशाला कंदलगावच्या SSC बॅच (1998-99) चा स्नेहमेळावा रविवार (दि. २२ मार्च २०२६) रोजी सकाळी ९ वाजता उत्साहात आणि आनंदमय वातावरणात पार पडला.
   या कार्यक्रमास कवचाळे सर, जवळकोट सर, मलकरी सर, दशवंत मॅडम, बिराजदार सर, देवकते सर, जोकारे सर, पुजारी सर, टी आर पाटील सर , सुतार सर ,मुख्याध्यापक कमळे सर ,तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत कृतज्ञता व्यक्त केली.
   “त्या” शाळेच्या आठवणी, मित्रमैत्रिणींसोबतचे क्षण आणि आयुष्यातील प्रवास यांचा भावनिक आविष्कार यावेळी पाहायला मिळाला. मान्यवरांसह माजी विद्यार्थ्यांनीही आपल्या मनोगतातून आठवणींना उजाळा देत मैत्रीचा धागा अधिक घट्ट केला.
   या मेळाव्यास देवसिंग तुळजापूरचे सरपंच युवराज पाटील, मुंबई येथील इंजिनिअर कोणे, पुण्याचे इंजिनिअर गायतोंडे, पोलिस महानंदा स्वामी, मुंढेवाडीच्या मुख्याध्यापिका सुवर्णा पाटील मॅडम, माळकवटे शाळेचे बसवराज कोरे सर, अंजली साडी सेंटरचे मालक उमेश कोरे , कपिल भंडकुभे , रमेश करपे, सोमनिंग व्हणमाने तसेच बॅचमधील इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   या कार्यक्रमाचे आयोजन 1998 -99 चे सर्व विद्यार्थिनी केले होते.
 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा पाटील मॅडम,अनुमोदन बसवराज कोरे, आभार मल्लिनाथ कोरे CLIA LIC यांनी केले. आठवणी आणि आपुलकीच्या वातावरणात रंगलेला हा स्नेहमेळावा सर्वांच्या मनात कायमची छाप उमटवून गेला.असे मनोगत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads