नेरी–जळगाव रोडवरील बंद पेट्रोल पंपाच्या खोल्यांमध्ये संशयास्पद प्रकार?
नेरी–जळगाव रोडवरील गाडेगावजवळ असलेल्या बंद पडलेल्या पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस असलेल्या खोल्यांमध्ये संशयास्पद प्रकार सुरू असल्याची चर्चा परिसरात रंगू लागली आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस दोन ते तीन खोल्या असून त्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत.
मात्र काही नागरिकांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता या बंद खोल्यांमध्ये वापरलेले कंडोम तसेच त्यांची पाकिटे मोठ्या प्रमाणात पडलेली आढळून आली. त्यामुळे या ठिकाणी नेमका कोणता प्रकार सुरू आहे, याबाबत परिसरातील नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी व्यक्त होत आहे.स्थानिकांच्या मते, हे ठिकाण बराच काळ दुर्लक्षित असल्यामुळे काही अज्ञात व्यक्ती येथे येत असाव्यात. त्यामुळे येथे गैरप्रकार घडत असल्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी प्रशासन आणि पोलिसांनी या ठिकाणी तातडीने चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी केली आहे.दरम्यान, या प्रकारामुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून, संबंधित विभागाने या ठिकाणाची पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा