तीन वर्षांच्या चिमुकलीचा कमाल.. १३ तासांचा रमजानचा रोजा ठेवून झेबाने जिंकली सर्वांची मने
डॉ. मुशरफ खान यांच्या तीन वर्षांच्या चिमुकली झेबाने अवघ्या लहान वयात तब्बल १३ तासांचा रमजानचा रोजा पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
रमजान महिन्यात पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत उपवास (रोजा) पाळण्याची परंपरा आहे. झेबानेही आपल्या कुटुंबीयांसोबत रोजा ठेवण्याचा निर्धार केला. इतक्या लहान वयात दिवसभर संयम, शांतता आणि उत्साह राखत तिने रोजा पूर्ण केला, ही बाब सर्वांसाठी कौतुकास्पद ठरली आहे.
संध्याकाळी इफ्तारच्या वेळी कुटुंबीयांनी तिचे विशेष अभिनंदन केले. नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून झेबावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावरही तिच्या या कृत्याची चर्चा रंगली आहे.
लहान वयातच धार्मिक संस्कार आणि आत्मविश्वासाचे दर्शन घडवणाऱ्या झेबाचे सर्वत्र कौतुक होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
Previous article
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा