डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जामनेरमध्ये भव्य महास्वच्छता अभियान .... - दैनिक शिवस्वराज्य

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जामनेरमध्ये भव्य महास्वच्छता अभियान ....

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
आज दि. ०१/०३/२०३६ रविवार रोजी महाराष्ट्र भूषण, आ.  डॉ श्री नानासाहेब धर्माधि‌कारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड आयोजित स्वच्छाता हीच सेवा
आज सकाळी ठिक ७:४५ मिनिटांनी जामनेर नगर परिषदेच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा सौ. साधनाताई महाजन, उपनगराध्यक्ष डॉ. श्री. प्रशांत भाडे,जामनेर तालुका एज्यूकेशन सोसायटीचे सचिव श्री जितू पाटील,नगरसेवक श्री.महेंद्र बावस्कर, श्री आतिष झाल्टे, श्री सुभाष पवार, श्री पप्पू पाटील असे अनेक मान्यवर स्वच्छता अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.या महास्वच्छता अभियान कार्यक्रमात आज रोजी डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आयोजित हे अभियान आज संपूर्ण भारत देशभरात राबविले जात आहे. हे अभियान यशस्वी पार पाडण्यासाठी २ रिक्षा (मालवाहू) तसेच १२ ट्रॅक्टर,नगरपालिका मार्फत 2 ट्रैक्टर व ३ घंटागाड्या इतक्या वाहनांचे सहकार्य मिळाले जामनेर परिसरातील १७ बैठकी मार्फत
६९२ श्रीसदस्य स्वच्छता अभियानासाठी उपस्थित होते. त्यांनी ओला कचरा ७.६ टन व सुका कचरा ११.४ टन असा एकूण कचरा १९.०० टन संकलीत करण्यात येऊन तो पहाडी बाबा येथे डंपींग ग्राउंड मध्ये जमा करण्यात आला.
या महास्वच्छता अभियानात ११.३ किमी दुतर्फा रस्ते स्वच्छ करण्यात आले व १,९९, ८00 स्क्वेअर मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला. या प्रमाणे संपूर्ण शहर चकाचक करण्यात आले.महत्वाची माहिती :- या स्वच्छता अभियाना सोबत - डॉ.श्री. नानासाहेब साहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत १)वृक्ष लागवड व संवर्धन, २) रक्तदान शिबीर ३) विहीर पूनर्रभरण ४) शैक्षणिक साहित्याचे वाटप ५) व्यवसाय मार्गदर्शन ६) अंध व अपंग व्यक्तीसाठी गरजू साहित्य वाटप ७) बस थांबे निर्मिती ८) पाणपोई असे विविध कार्यक्रम पद्‌मश्री महाराट्रभूषण आ. ती. डॉ.श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी व रायगड भूषण आ.ती. डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरील उपक्रम राबविले जातात.
असेच कार्यक्रम भारता बाहेरील अनेक देशातही राबविले जातात. श्री सदगुरुच्या बैठकीमार्फत समाज जागृती,अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, स्वधर्म, स्वदेश ,स्वदेव, मानवताधर्म व नीतीमूल्याची जोपासणी यांची शिकवण भी बैठकीच्या माध्यमातून दिली जाते .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads