जामनेर भाजप युवा मोर्च्याची नवी कार्यकारणी जाहीर; शुभम माळी यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा
जामनेर शहरात भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्च्याची नवी कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टी जामनेर शहर मंडळातर्फे ही घोषणा करण्यात आली.
युवा मोर्चा अध्यक्षपदी शुभम राजेश माळी यांची निवड करण्यात आली. भाजपचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन शुभम माळी यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या निवडीमुळे युवा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले असून आगामी काळात पक्ष संघटन अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उपाध्यक्ष – नितीन आनंदा भोई
उपाध्यक्ष – निलेश राजेश जाधव
उपाध्यक्ष – हर्षल संजय पाटील
कोषाध्यक्ष – ऋषिकेश आत्माराम शिवदे
सदस्य – सतीश त्रंबक माळी
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जामनेर शहर चिटणीस
दिपक अशोक पाटील यांची पण निवड करण्यात आली.
निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करताना पक्षाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील युवकांना संघटित करून विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास माननीय जितेंद्र पाटील, अतिष झाल्टे, रवींद्र झाल्टे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेर शहरात युवा मोर्च्याच्या नव्या टीमकडून पक्ष संघटन विस्तारासोबतच सामाजिक व विकासात्मक कामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा