अंत्रोळी ग्रामस्थांचा मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर ठिय्या ; ‘१२ ऐवजी १६ फूट रस्ता’ प्रकरणी कारवाईची मागणी... मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी ; चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा - दैनिक शिवस्वराज्य

अंत्रोळी ग्रामस्थांचा मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर ठिय्या ; ‘१२ ऐवजी १६ फूट रस्ता’ प्रकरणी कारवाईची मागणी... मंडळ अधिकाऱ्यांवर निलंबनाची मागणी ; चौकशी न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा


समीर शेख प्रतिनिधी 
सोलापूर (मंद्रूप) – दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील रस्ता प्रकरण चांगलेच तापले असून संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी मंद्रूप अप्पर तहसील कार्यालयासमोर  ठिय्या आंदोलन सुरू केले.                
      तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानुसार १२ फूट रुंदीचा रस्ता मोकळा करण्याचे निर्देश असताना प्रत्यक्षात १६ फूट रुंदीचा रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. संबंधित मंडळ अधिकारी विंचूर यांच्यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
तहसीलदारांनी गट क्रमांक १७/१ व १७/२ मधून पूर्व–पश्चिम दिशेने १२ फूट रस्ता करण्याचे आदेश दिले होते. मात्र १९ जानेवारी २०२६ रोजी पोलीस बंदोबस्तात प्रत्यक्षात १६ फूट रुंदीचा रस्ता करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. या कारवाईदरम्यान ऊस पिकासह बोअर पाईपलाईनचे नुकसान झाल्याचे अर्जदार वर्षा नेताजी थोरात यांनी सांगितले.
    आदेशात नमूद नसतानाही दक्षिण–उत्तर दिशेचा मार्ग तयार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. रस्त्यासाठी टाकण्यात आलेल्या सुमारे १५० ब्रास मुरुमाच्या रॉयल्टीची कागदपत्रे सादर करावीत, पंचनामा घटनास्थळी का करण्यात आला नाही याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
    संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावे आणि अनधिकृत रस्ता हटवावा, या मागण्यांवर ग्रामस्थ ठाम असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads