शेंदूर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळा अनावरण कार्यक्रमासंदर्भात झालेल्या प्रशासकीय हलगर्जीपणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई ची मागणी
जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे
जामनेर - तालुक्यातील शेंदुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाबाबत वारंवार कार्यक्रमाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने शहर व परिसरातील नागरिक, शिवप्रेमी तसेच विविध सामाजिक संघटनांना मोठ्या प्रमाणात निमंत्रण देण्यात आले.मात्र
दिनांक ३ मार्च २०२६ रोजी सदर कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने नागरिक कार्यक्रमस्थळी उपस्थित झाले असताना कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व संतापाची भावना निर्माण झाली. या कार्यक्रमासंदर्भात झालेल्या प्रशासकीय हलगर्जीपणाची चौकशी करूनजबाबदार वर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जामनेर तालुका महाविकास आघाडी तर्फे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नुकतेच पोलीस अधीक्षक यांना तसेच जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की -
सदर कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असताना अधिकृत निमंत्रणपत्रिकेमध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करताना शासनाचे नियम व प्रशासकीय मार्गदर्शक सूचना पाळणे बंधनकारक असताना या बाबीकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येते.
महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम १९६५ नुसार सार्वजनिक कार्यक्रमांचे नियोजन करताना प्रशासनाची जबाबदारी निश्चित असते. तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी आवश्यक त्या प्रशासकीय परवानग्या, सुरक्षा व्यवस्था व समन्वय राखणे आवश्यक असते.मात्र सदर प्रकरणात योग्य नियोजन व समन्वयाचा अभाव असल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे.
म्हणून महाविकास आघाडीच्या वतीने खालील मागण्या करण्यात येत आहेत की संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय प्रशासकीय चौकशी करण्यात यावी.आवश्यक परवानग्या व नियोजन न करता कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ नुसार कारवाई करण्यात यावी. शासकीय कार्यक्रमामध्ये वैयक्तिक स्वरूपाच्या बाबींचा समावेश करून नागरिकांची दिशाभूल केल्याबाबत जबाबदारांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमांसाठी स्पष्ट प्रशासकीय नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. शेंदुर्णी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांची चौकशी करून त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा वरील मागण्यांवर लवकरात लवकर ठोस कारवाई करण्यात यावी. अन्यथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानासाठी व न्याय मिळवण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र स्वरूपाचे भव्य जनआंदोलन छेडण्यात येईल, याची प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी. असा इशाराही देण्यात आला आहे.राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष श्री किशोर आप्पा पाटील व जामनेर तालुक्याचे राष्ट्रवादी शेंदुर्णी शहराचे नेते ती सतीश चंद्र कशी साहेब व अध्यक्ष शेंदुर्णी शहर अध्यक्ष रजनीकांत शुक्ला तसेच नगरपंचायतचे नगरसेवक अमरीश गरुड शरीफुद्दीन शेख उज्वल देविदास निकम विलास देशमुख नगरसेवक पती प्रवीण रमेश गरुड जागृती श्रीराम काटे. व श्रीराम काटे उभाटाचे कार्यकर्ते प्रवीण पाटील व संजय सूर्यवंश, खेळाचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते राजूभाऊ चौधरी इत्यादी लोक हजर होते निवेदन देताना.

Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा