जामनेरच्या अजय ठाकूर यांची मोठी झेप.. ‘वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक’ पदाचा पदभार स्वीकारला - दैनिक शिवस्वराज्य

जामनेरच्या अजय ठाकूर यांची मोठी झेप.. ‘वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक’ पदाचा पदभार स्वीकारला

जळगांव जिल्हा प्रतिनिधी नितीन इंगळे 
 जामनेर शहरातील प्रशासनात काम करताना आपली छाप पाडणारे अधिकारी अजय संतोष ठाकूर यांनी समाज कल्याण विभागात मोठी झेप घेत वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे. दि. १२ मार्च २०२६ रोजी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात त्यांनी अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला.
जामनेरचे रहिवासी असलेले अजय ठाकूर यांनी यापूर्वी जामनेर येथे पुरवठा अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. आपल्या कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध कामकाजामुळे त्यांची प्रशासनात ओळख निर्माण झाली होती. त्याच अनुभवाच्या जोरावर त्यांना समाज कल्याण विभागात महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
पदभार स्वीकारताना सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.जामनेर तालुक्यातील अधिकारी उच्च पदावर नियुक्त झाल्यामुळे शहर व तालुक्यातील नागरिकांकडून अजय ठाकूर यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे समाज कल्याण विभागातील कामकाज अधिक गतिमान होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Previous article
This Is The Newest Post
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads